कर्मचारी व्यवस्था खराब करत असतील आणि लोक आपली द्वेषपूर्ण मते मांडून वातावरण कलुषित करून व्यवस्था मोडून काढण्यास हातभार लावत असतील, तर दोन्हींचाही धिक्कारच केला पाहिजे!

भ्रष्ट व्यवस्था सुधारली तर ‘लोक कल्याणकारी राज्य’ नक्कीच अस्तित्वात येईल, याचे भान ‘व्हॉटसअप-फेसबुक विद्यापीठां’च्या ‘स्वयंघोषित विचारवंतां’ना असायला हवे. एकमेकांचा द्वेष करून, ‘त्याला आहे मग मला का नाही, मला नसेल तर त्यालाही देऊ नका’, अशा प्रकारची मांडणी करून आपण भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी घालत आहोत. त्यामुळे असे द्वेषपूर्ण विचार मांडून कल्याणकारी राज्याचे गाजर दाखवणे, हा एक दुटप्पीपणा आहे.......